ब्रम्हपुरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. ब्रम्हपुरी अन्त्तर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्वयंसहाय्यता समूहांनी दिवाळी सनानिमित्य बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी ब्रम्हपुरी येथील मुख्य शिवाजी चौकात भव्य स्टॉल उभा करून दिवाळीचे फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन मा. रामलालजी दोनाडकर सभापती पं.स. ब्रम्हपुरी यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी सौ. वंदनाताई ठवकर उपसभापती पं.स. ब्रम्हपुरी, कु. प्राजक्ता भस्मे गट विकास अधिकारी पं.स. ब्रम्हपुरी, श्री थानेश्वरजी कायरकर, श्री निलकंठजी मानापुरे, श्री.प्रकाशजी नन्नावरे, सौ. प्रणाली मैंद, सौ, ममताताई कुंभारे, सौ.सुनंदाताई ढोरे,सौ उर्मिलाताई धोटे, श्री.विलासजी उरकुडे सर्व सदस्य पं.स. ब्रम्हपुरी उपस्थित होते. सदर विक्री प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील १२ समूह साहित्यासह विक्रीसाठी सहभागी झालेत.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री.दिनेश जांभूळकर तालुका अभियान व्यवस्थापक, श्री आनंदराव राऊत तालुका व्यवस्थापक, श्री. प्रवीण सायंकार, रितेश मारकवार, कु.गोपिका येटे प्रभाग समन्वयक, श्री भाऊदास बनकर, पवन बारसागडे CLM व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. ब्रम्हपुरी च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व दिवाळीचे फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन झाले.
यानिमित्याने जास्तीत जास्त लोकांनी दिवाळीचे फराळ व साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.