\
नागभीड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, नागभीड मधील तळोधी(बा.) या गावातील भरारी प्रभाग संघ, तळोधी-गोविंदपूर प्रभाग व उडान प्रभाग संघ, गिरगाव-वाढोणा प्रभाग याला, बाळापुर बु. येथील शारदा आदिवासी स्वयं सहायता समूह व कीरमिटी मेंढा
येथील विकास महिला ग्राम संघ यांना भेट दिली. दिनांक 31 ऑगस्ट 2021 ला पंचायत समिती, नागभीड येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी आढावा सभा घेतली होती. त्याच अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2021 ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. भेटीदरम्यान झालेली कामे योग्य पद्धतीने झालीत काय?, त्यात कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे., कोणत्या बाबींची आणखी आवश्यकता आहे., कोणत्या योजनेतून सदर बाबींचा लाभ मिळवून देता येईल, ग्राम संघाच्या कार्यालया करिता तालुकास्तरीय व गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेने सहकार्य करणे, इत्यादी बाबी सांगितल्या. भेटीदरम्यान मा.श्री. संजय पुरी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, नागभीड, मा.श्री. राजेंद्र ठोंबरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, नागभीड,मा.श्री. मोहित नैताम, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, नागभीड, श्री.अमोल मोडक,BM-SIIB & CB, श्री. आमिर खान, BM-MIS M&E, श्री. शुभम देशमुख,CC, श्री. दीपक गायकवाड,CC, कु. ज्योती साळवे,CC, कु. दिपाली दोडके,CC, श्री. किशोर मेश्राम,CAM, श्री.अमोल जिवतोडे,CAM, श्री.निकेश हजारे,CAM, श्री. जगदीश हजारे,CLM व श्री. इंद्रजीत टेकाम,CFM उपस्थित होते.