कळमना येथे महासमृधी कार्यशाळा
March 27, 2021
0
राजूरा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राजुरा अंतर्गत गोवरी -सास्ती प्रभागातील कळमना गावात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतीक महीला दिन 8 मार्च पासून ते जागतीक पर्यावरण दिन 5 जून या कालावधीत महासमृधी महीला सक्षमीकरण अभियान दिनांक 25/03/21रोजी प्रेरणा महिला ग्राम संघ च्या वतीने गाव पातळीवर कार्य शाळा व महिला मेळाव्याचा कार्यक्रम तसेच ग्रामसंघ कार्यालय उदघाटन कार्यक्रम घेन्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष . म्हणून संध्या डोंगरे तालुका अभियान व्यवस्थापक राजुरा,प्रमुख अतिथी मा.मंगेश गुरनुले उपसभापती पं स. राजुरा ,प्रमुख पाहुणे सौं. कुंदाताई जेणेकर माजी सभापती पं. स. राजुरा,संरपच वाढई साहेब ,ग्रामपंचायत सदस्य, Bm fi -श्री. नगराळे सर,प्रभाग -समन्व्यक साईकिरण धोटे, clm बोढे,अंगणवाडी सेविका , ग्राम संघ पदाधिकारी व सदस्य ,कृषी, पशु सखी, crp ताई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.सदर मान्यवर यांनी उपस्तित महिलांना समूह, ग्रामसंघ, तसेच उमेद च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या माध्यमातून महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, तसेच स्वउदयोजक कसे बनता येईल व आत्मनिर्भर कसे होता येईल.इत्यादी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन crp सौं. संगीता उमाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता धांडे यांनी केले...